उत्तम संभाषण करण्यासाठी हे कराचं

बोला आणि जगावर राज्य करा
१. छोट्या कागदावर फक्त मुख्य मुद्देच लिहा, जेणेकरून तुम्ही भाषण करताना विसरणार नाही.
२.तुम्ही जे बोलणार आहात त्याचे लिखितस्वरुप तयार करा व त्याचा सराव करा.
३. व्यासपीठावर गेल्यानंतर स्थिरस्थावर व्हा व प्रेक्षकांवर नजर फिरवा.
४. जर प्रेक्षक परस्परांमध्ये कुजबुजत असतील तर शांत राहण्यास सांगून त्यांचे लक्ष खुबीने तुमच्या भाषणाकडे वळवा.
५. भाषण करत असताना स्वतःला उत्साही ठेवा.
६.तुमच्या आवाजामध्ये नेहमी समतोलता ठेवा.
७. तुमची उभी राहण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत व हातवारे करण्याची पद्धत यावर नियंत्रण ठेवा.
८. प्रेक्षकांच्या नजरेला नजर भिडवा.
९. तुम्ही काय म्हणता ते समजण्यासाठी आणि ते जाणून घेण्यासाठी लोकांना वेळ द्या.
१०. गळा सुकल्यासारखा वाटल्यास पाण्याऐवजी चिमूटभर मीठ किंवा लिंबूरसाचा वापर करा.
हे सुद्धा वाचा – “ना पैशाने ,ना सौंदर्याने, जग जिंकूया फक्त बोलण्याने”
११. सुस्पष्ट आणि हळूवारपणे बोला.
१२. प्रेक्षकांचा दर्जा ओळखून आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवा.
१३. दुसऱ्याची नक्कल करण्याऐवजी स्वतःची वेगळी पद्धत अनुसरा, त्यामुळे भाषणात सहजपणा येतो.
१४. सत्य घटना, उदाहरणे, कथा, विनोद इत्यादिंचा उपयोग करा.
१५. तुमच्या विषयावर अंमल गाजवा परंतु आक्रमकता टाळा.
१६. प्रत्येक शब्दाचे महत्त्व, उच्चार व प्रस्तुतीकरण समजून घ्या.
१७. विस्तीर्ण दृष्टिकोन ठेवा.
१८. निरीक्षणशक्ती विकसित करा.
१९. बाह्य वेशभूषेसह अंतर्गत व्यक्तिमत्त्वालाही महत्त्व द्या.
२०. प्रभावी व परिणामकारक शेवट करा.