Relationship

वाईटातून चांगलं शोधण्याची कला .

The art of finding the good in the bad

बऱ्याचदा तुमचा दृष्टिकोन (ATTITUDE )बदलला की तुमचे घटनांबद्दलचे, गोष्टींबद्दलचे आकलन बदलू शकते. त्यामुळे तुम्ही निर्णय जर वेगळ्या प्रकारे घेतलात तर त्याने साधणारे परिणाम नक्कीच वेगळे असतील. ‘थिंक ॲन्ड ग्रो रिच’ (THINK AND GROW RICH ) ह्या एका चांगल्या आणि गाजलेल्या पुस्तकाचा लेखक नेपोलियन हिल म्हणतो की ‘प्रत्येक प्रश्नात किंवा अडचणीत, तितक्याच किंवा अधिक चांगल्या व मोठ्या फायद्याची बीजे रोवलेली असतात. ‘

अमेरिकेत राहणाऱ्या व स्वकष्टाने कोट्याधीश(millionaire) झालेल्या पाचशेपेक्षा अधिक लोकांच्या मुलाखती नेपोलियन हिल याने घेतल्या. त्यातून असे स्पष्ट झाले की त्या सगळ्या जणांमध्ये काही गुण समान होते. त्यातला एक गुण असा होता की, त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या वाट्याला अपयश(FAILURE) आले, अडचणी (PROBLEMS)आल्या, पण त्यातून योग्य तो धडा घेत, ह्या साऱ्या व्यक्ती समोर आलेल्या समस्येला थेट सामोऱ्या गेल्या. एकूणच, वाट्याला आलेल्या अपयशातून किंवा अडचणीतून उपयुक्त असा धडा त्या सर्वांनी शोधला. मुख्य म्हणजे त्यांना तो धडा मिळालाही । प्रत्येक अपयशातून किंवा अडचणीतून उपयुक्त असा धडा शिकून त्यावरुन सुधारणा केल्यामुळे अनेकांनी आपल्या आयुष्यात बरीच संपत्ती मिळवली. जो घडा ते शिकले, त्याच्या आधारे त्या व्यक्तींनी काही लोकविलक्षण असे उत्पादन शोधून काढले आणि म्हणूनच ते श्रीमत होत गेले. त्यातल्या काहींनी तर अत्यंत प्रेमाने व जाणतेपणाने आपल्या जिव्हाळ्याच्या प्रांतात अपरिमित कष्ट घेतले. प्रारंभी जरी त्यांच्या वाट्याला अपयश आले असले, तरी त्या अपयशातून तसेच नानाविध अनुभवातून नवनवीन घडे त्यांनी मिळवले. एकूणच, आपल्या व्यवसायातून वा नोकरीतून अधिक पैसे किंवा पगार मिळण्यासाठी ते सतत वेगाने व योग्य दिशेने काम करीत होते.

समाजातील सकारात्मक विचार करणाऱ्या आणि यशस्वी ठरलेल्या व्यक्तीप्रमाणे आपले विचार व्हावे, यासाठी एक सोपा मार्ग आहे. तुमच्या आयुष्यात आज जो सर्वात मोठा प्रश्न असेल, त्याबद्दल विचार करा. असा विचार करा की, हा प्रश्न तुम्हाला भेट म्हणून आणि तुम्हाला काहीतरी नवी शिकवण देण्यासाठी पाठवला गेला आहे. त्यानंतर स्वतःला विचारा की, ‘ज्यामुळे मला आनंदी होता येईल व पुढच्या आयुष्यात यशस्वी होता येईल, असा कोणता धडा मी यातून घेऊ शकतो ?’

तुम्हाला आज जो सर्वात मोठा प्रश्न वाटतो आहे, तो कदाचित प्रश्न नसेलच. कदाचित ती एक संधी असेल. हेन्री फोर्ड तर म्हणतो, ‘अपयश ही अधिक अक्कलहुशारीने व चांगल्याप्रकारे सुरुवात करण्याची संधी असते.’

'Failure is an opportunity to start smarter and better.'

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button