सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी महाविद्यालयात जागा राखीव ठेवाव्यात – डॉ. कुमार गायकवाड
पुणे : सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी यासाठी सरकारी महाविद्यालयांमध्ये त्यांच्या साठी काही जागा राखीव ठेवाव्यात, अशी मागणी डॉ. कुमार गायकवाड यांनी केली आहे.
त्यांच्या मते, खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरण कमी मिळते, परिणामी त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणे कठीण जाते. त्यामुळे त्यांच्यासाठी सरकारी महाविद्यालयांमध्ये ठराविक जागा राखीव ठेवण्याची गरज आहे.
“सरकारी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी प्रचंड प्रतिभावान असतात, मात्र त्यांच्या आर्थिक आणि शैक्षणिक मर्यादांमुळे ते स्पर्धेत मागे राहतात. त्यांना योग्य संधी दिल्यास ते निश्चितच उज्ज्वल भविष्य घडवू शकतात.” असेही डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केले.
शिक्षणाच्या संधी समान असाव्यात यासाठी सरकारने लवकरच योग्य निर्णय घ्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या प्रस्तावाला अनेक पालकांनी पाठिंबा दर्शवला आहे.
