Health

रिधोरे येथे दिव्यस्पर्शी क्लिनिक व निसर्गोपचार केंद्राच्या वतीने शरीरशुद्धी शिबिर संपन्न

माढा : दिव्यस्पर्शी क्लिनिक व निसर्गोपचार केंद्राच्या वतीने २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष शरीरशुद्धी शिबिराचे आयोजन  करण्यात आले. या शिबिरात २७ रुग्णांनी सहभाग घेतला, त्यांना मोफत तपासणी तसेच सात दिवसांचे औषधोपचार देण्यात आले. या शिबिरात डॉ. कुमार गायकवाड व डॉ. श्वेता सिंग यांनी मार्गदर्शन केले. शरीरशुद्धी प्रक्रियेद्वारे रुग्णांचे संपूर्ण आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला. संपूर्ण सविस्तर तपासणीनंतर रुग्णांना सात दिवसांची औषधे विनामूल्य वितरित करण्यात आली.  शिबिरादरम्यान अनेकांनी निसर्गोपचार पद्धतीचा सकारात्मक अनुभव घेतल्याचे सांगितले. शिबिरामुळे आरोग्य जागरूकता वाढवण्यास मदत झाली व भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे अशी मागणी उपस्थित रुग्णांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button