पुण्यात दिव्यस्पर्शी क्लिनिक व निसर्गोपचार केंद्राच्या वतीने १५ फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
पुणे : दिव्यस्पर्शी क्लिनिक व निसर्गोपचार केंद्राच्या वतीने १५ फेब्रुवारी रोजी पुण्यात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १५७ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. डॉ. कुमार गायकवाड व डॉ. श्वेता सिंग यांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन केले.या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जुनाट आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. निसर्गोपचार पद्धतींविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आणि त्याचा दैनंदिन आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.शिबिरादरम्यान ३५ रुग्णांनी १० दिवसीय शरीरशुद्धी प्रक्रियेसाठी नोंदणी केली. या प्रक्रियेद्वारे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यावर भर देण्यात आला.स्थानिक नागरिकांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले आणि शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मदत केली. उपस्थित रुग्णांनी डॉक्टरांचे आभार मानले व अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले
