Uncategorized

आनंदी परिवार फाऊंडेशनचे व्यसनमुक्ती अभियान यशस्वी; १,२४० जणांनी सोडले दारूचे व्यसन

पुणे :
दारूच्या व्यसनामुळे कुटुंब, आरोग्य आणि आर्थिक स्थिती उद्ध्वस्त होण्याच्या घटना वाढत असताना, आनंदी परिवार फाऊंडेशन, पुणे यांच्या माध्यमातून चालवले जाणारे व्यसनमुक्ती केंद्र अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरत आहे. डॉ. कुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या या केंद्रात आत्तापर्यंत तब्बल १,२४० जणांनी दारूचे व्यसन कायमस्वरूपी सोडल्याची माहिती संस्थेने दिली आहे.

महाराष्ट्रातील व्यसनमुक्तीसाठी निसर्गोपचार पद्धतीचा वापर करणाऱ्या या केंद्रात व्यसनी व्यक्तींच्या मानसिकता आणि परिस्थितीचा सखोल अभ्यास करून उपचार केले जातात. अनेकदा व्यसनाधीन व्यक्तीला व्यसन सोडण्याची इच्छा नसते किंवा ते सहकार्य करत नाहीत. अशा वेळी कुटुंबीयांच्या मदतीने सुरुवातीच्या टप्प्यात आवश्यक वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार प्रक्रिया सुरू केली जाते. त्यानंतर हळूहळू संबंधित व्यक्तीचे सहकार्य वाढवून त्याला केंद्रात बोलावून पुढील समुपदेशन व उपचार दिले जातात.

डॉ. कुमार गायकवाड यांनी सांगितले की, “व्यसनमुक्ती ही केवळ औषधोपचारांची प्रक्रिया नसून मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक आधाराचीही गरज असते. योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण उपचारांमुळे व्यसन पूर्णपणे सोडणे शक्य आहे.”

या केंद्रात समुपदेशन, निसर्गोपचार, आहार नियोजन आणि कुटुंबीयांचे मार्गदर्शन अशा विविध पद्धतींचा समावेश असून, अनेक कुटुंबांनी सकारात्मक अनुभव व्यक्त केले आहेत. व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तींनी नव्या आयुष्याची सुरुवात करत समाजात पुन्हा सन्मानाने उभे राहिल्याचे उदाहरणेही पुढे आली आहेत.

व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तींसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आनंदी परिवार फाऊंडेशनचे हे व्यसनमुक्ती केंद्र आशादायी ठरत असून, अधिक माहितीसाठी इच्छुकांनी थेट संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button