Uncategorized

संधिवाताच्या रुग्णांसाठी आशेचा किरण – दिव्यस्पर्शी संधिवात पुनर्वसन केंद्र

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी–कुर्डुवाडी रोडवरील रिधोरे येथे सुरू असलेले दिव्यस्पर्शी संधिवात पुनर्वसन केंद्र सध्या संधिवाताच्या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे. येथे उपचारासाठी येणाऱ्या अनेक रुग्णांना अल्पावधीतच आराम मिळत असल्याचा सकारात्मक अनुभव मिळत असून त्यामुळे परिसरातील तसेच इतर जिल्ह्यांतील रुग्णही या केंद्राकडे आकर्षित होत आहेत.

या केंद्रात अनुभवी तज्ज्ञ डॉ. कुमार गायकवाड आणि डॉ. श्वेता सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली संधिवाताच्या रुग्णांवर उपचार केले जातात. विशेष म्हणजे या ठिकाणी पूर्णपणे निसर्गोपचार पद्धतीचा अवलंब केला जातो. शरीराच्या नैसर्गिक संतुलनावर आधारित विविध उपचार पद्धतींमुळे रुग्णांच्या वेदना कमी होण्यास मदत होत असल्याचे अनेक रुग्ण सांगतात.

केंद्राची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणतेही अ‍ॅलोपॅथी उपचार केले जात नाहीत. औषधांवर अवलंबून न राहता निसर्गोपचार, जीवनशैली सुधारणा आणि नैसर्गिक पद्धतींच्या साहाय्याने रुग्णांना आराम देण्याचा प्रयत्न केला जातो.

रिधोरे येथील या केंद्रात उपचार घेतलेल्या अनेक रुग्णांनी गुडघेदुखी, सांधेदुखी आणि संधिवाताच्या त्रासातून मोठ्या प्रमाणात आराम मिळाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे संधिवाताने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हे केंद्र एक नवी आशा ठरत आहे.

संधिवाताच्या वेदनांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी एकदा तरी दिव्यस्पर्शी संधिवात पुनर्वसन केंद्र, रिधोरे (बार्शी–कुर्डुवाडी रोड), जि. सोलापूर येथे भेट देऊन माहिती घ्यावी, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात येत आहे. योग्य मार्गदर्शन आणि निसर्गोपचाराच्या साहाय्याने संधिवातावर नियंत्रण मिळवण्याचा नवा मार्ग येथे उपलब्ध होत असल्याने अनेक रुग्णांसाठी हे केंद्र खरोखरच आशेचा किरण ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button