कोणत्याही परीक्षेत हमखास यश मिळवण्याची 10 सूत्रे

प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की आपला परीक्षेत भरपूर मार्क मिळावेत. तो मन लावून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो परंतु जेव्हा अभ्यासाला बसतो तेव्हा अचानक काहीतरी होते आणि त्याचे लक्ष अभ्यासातून बाहेर निघून जाते. आज प्रत्येक विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी त्याच्या आजूबाजूला भरपूर साधने आहेत त्यापैकीच एक म्हणजे मोबाईल सुद्धा आहे. मोबाईल सोबतच वेगवेगळ्या गेम्स, सोशल मीडिया साइट्स येणारच.त्याचबरोबर आपले आजूबाजूचे मित्र – मैत्रिणी यांचे आवाज, नातेवाईक, घरातील इतर मंडळी यांचा सुद्धा त्रास होतोच. या सर्व अडथळ्यावर मात करून जर तुम्हाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे असेल तर खाली दिलेल्या टिप्सचा वापर करा.
१) अभ्यासासाठी घरातील योग्य जागा निवडा .
२) अभ्यासाला तुमचं दररोजचे रुटीन बनवा.
३) चित्त विचलित करणाऱ्या सर्वच गोष्टींना दूर ठेवा.
४) प्रत्येक विषयाचा योग्य पद्धतीने अभ्यास करा.
५) प्रत्येक गोष्टीसाठी स्वयंशिस्त गरजेची आहे. तुमच्या प्रत्येक कृतीसाठी शिस्त ठरवा.
६)तुमच्या शरीराला योग्य आराम मिळेल याची काळजी घ्या.
७)अधून मधून अभ्यासातील प्रगतीचा आढावा घ्या.
८) स्वत:च्या शरीराच्या मर्यादा व क्षमता ओळखा.
९) पुरेशी झोप घ्या.
१०) दररोज सकस आहार घ्या .