आर्थिक

आता तुमच्या वाहनावर दंड करण्याची कोणी हिंमत सुद्धा करणार नाही.

तुमच्या वाहनावर कोणताही दंड होऊ नये यासाठी खालील नियम पाळा

‘हे’ नियम पाळा…

1) आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर सर्वप्रथम काढून घ्या, त्याशिवाय गाडी चालवू नका.
2) टू व्हीलरवर जाताना गाडी चालवणाऱ्याने हेल्मेट घाला आणि शक्य झाले तर गाडीमागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील हेल्मेट घालायला सांगा.
3) गाडी चालवताना आपल्या गाडीची कागदपत्रे तसेच ड्रायव्हिंग लायसन्स, सोबत बाळगावे.
4) गाडीचा इन्शुरन्स अद्ययावत ठेवा, संपला असेल तर पुन्हा अपडेट करुन घ्यावा.
5) आपली गाडी शक्यतो दुसऱ्या व्यक्तीला चालवण्यासाठी देऊ नका आणि जर द्यावीच लागली तर त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का ते चेक करुनच द्यावी.
6) आपल्या टू व्हीलरवर तिसरा व्यक्ती बसवू नका.
7) आपली गाडी जर आपण एखाद्या व्यक्तीला विकली असेल किंवा विकत असाल तर ती गाडी त्या व्यक्तीने त्याच्या नावावर करुन घेतली आहे का? ते पाहा, कारण जर ती गाडी तुमच्याच नावावर राहिली तर त्या गाडीवर पडणारा ऑनलाईन दंड आपल्या नावावर आपल्या घरच्या पत्यावर येणार,(वाहतूक कोर्टचे पत्र आपल्या घरी येणार)
8) लहान मुलांना गाडी चालवण्यास देऊ नका, जोपर्यंत मुलगा ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याच्या नियमात बसत नाही, तोपर्यंत त्यास गाडी चालवण्यास देऊ नका.
9) गाडी चालवताना सिग्नल कटिंग करु नका, सिग्नलला कॅमेरा असतो, आपल्या वाहनावर CCTV कॅमेरामार्फत दंड पडतो आणि आपल्या गाडी नंबरवरुन आपल्या घरच्या पत्यावर येतो.
10) सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर वाहन थांबवू नका.
11) लाल सिग्नल लागते वेळी गाडीचा वेग वाढवू नका, पिवळा सिग्नल लागताच गाडीचा वेग कमी करुन गाडी थांबवा.
12) जवळचा रस्ता पडेल म्हणून उलट्या दिशेने (Wrong Side) ने वाहन चालवू नका.
13) गाडी नो पार्किंग एरिया किंवा फुटपाथवर पार्क करु नका. पार्किंग असलेल्या ठिकाणी गाडी पार्क करा.
14) गाडी चालवण्या आगोदर गाडीच्या टायर मधील हवा आणि पेट्रोल चेक करा, कमी असेल तर भरून घ्यावे.
15) वेळीच गाडीची सर्व्हिसिंग करुन घ्या म्हणजे गाडी रस्त्यात कधी बंद पडू नये याची काळजी घावी.
16) जड वाहतूक दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या रोडने घेऊन जावा.
17) फोर व्हीलर, किंवा मोठी गाडी चालवताना नेहमी सीट बेल्टचा वापर करावा.
18) गाडीची नंबर प्लेट फॅन्सी असेल किंवा तुटलेली असेल तर ती बदलून टाका, व्यवस्थित मोठ्या अक्षरात गाडी नंबर दिसेल अशी नंबर प्लेट गाडीला लावा.
19) खाजगी गाड्यावर पोलीस किंवा इतर काही मजकूर लिहू नका.
20) आपल्या वाहनाला दोन्ही बाजूला आरसे असणे गरजेचे आहे.
21) आपल्या वाहनाला कर्कश्य हॉर्न बसवू नका.
22) चारचाकीला डार्क काळ्या काचा बसवू नका, गाडीमधील माणूस बाहेरच्या व्यक्तीला दिसेल अशी काच बसवावी
23) गाडीची फ्रंट लाईट आणि बॅक लाईट आणि पुढील व मागील इंडिकेटर बंद असेल किंवा तुटलेले असेल तर ते दुरुस्त करुन घ्यावे.
24) गाडीवर किंवा गाडीमध्ये बसून राहून गाडी रस्त्यावर थांबवून मागून येणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण करु नका.

Related Articles

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button