
१. नोकरी अधिक सुरक्षित आहे:
• नोकरी करण्याचे सुरक्षितता हे सर्वात महत्वाचे कारण आहे. तज्ञाच्या मते सध्याच्या काळात नोकरीची कोणतीही हमी नाही. पण याचा अर्थ, एखादा व्यवसाय सुरू करणे हे अधिक सुरक्षित आहे का? तर ते तसेही नाही. तुलनेने नोकरीमध्ये अधिक सुरक्षितता मिळते.
• आपली नोकरी गमावल्यास आपण आणखी एक नवीन नोकरी शोधू शकता. परंतु व्यवसाय गमावल्यास पुन्हा उभे राहणे थोडे कठीण असते.
२. स्थिर उत्पन्नः
आर्थिक असुरक्षिततेचा सामना करणे तसे कठीण असते, त्यामुळे अशा मानसिकतेच्या माणसांनी नोकरी करणेच योग्य आहे.
● आपल्या समाजामध्ये आर्थिक स्थैर्य खूप महत्वाचे आहे. चांगली नोकरी. चांगला पगार असणारी व्यक्ती आयुष्यात ‘सेटल’ समजली जाते. महिन्याकाठी येणारे निश्चित उत्त्पन्न आर्थिक स्थैर्य देते • आयटीसी लिमिटेड आणि हिंदुस्थान युनिलिव्हर या दोन्ही लिस्टेड कंपन्या आहेत आणि त्या ग्राहकउपयोगी वस्तूंच्या क्षेत्रात एकमेकांच्या कट्टर स्पर्धक
आहेत. दोन्ही कंपन्या व्यवसायिक व्यवस्थापनाद्वारे चालवल्या जातात. आर्थिक
वर्ष २०२०-२१ मध्ये, आयटीसीत १५३ आणि हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये १२३
कोट्यधीश मॅनेजर्स होते.
• नोकरीत फारसा पगार मिळत नाही, उत्पन्नाच्या मर्यादा आहेत असे कोणाला वाटत असेल तर लिस्टेड कंपन्यांचे त्यांच्या वेबसाईटवर मोफत उपलब्ध असणारे वार्षिक अहवाल तपासा. यात वार्षिक रु. १ कोटींपेक्षा जास्त पगाराचे पॅकेज असणाऱ्या मंडळींचा उल्लेख असतो.
३. कमी त्रासः
• तुमच्या डोक्यावर एक किंवा दोन बॉस असतात, तरीही तुम्हाला ती डोकेदुखी वाटते. मग कल्पना करा जर तुम्हाला १० बॉस असतील तर तुमची काय अवस्था होईल? व्यावसायीकांसाठी ग्राहक राजा बॉसपेक्षा कमी नसतो. त्यामुळे व्यवसायिकाला
दररोज शेकड्याने किंवा हजारो बॉसेसना सामोरं जावं लागतं. त्यामुळे
व्यावसायिकाच्या तुलनेने नोकरी करणाऱ्यांना कमी त्रास असतो.
४. कामाचे निश्चित तास :
काही ठरावीक प्रसंग सोडले तर साधारणतः नोकरी करणारी माणसे रोज ८ ते १० तास काम करतात. अनेकदा जायची वेळ निश्चित असते. यायची वेळ निश्चित नसली तरी फार फार तर एखाद दुसरा तास पुढे मागे होऊ शकतो. व्यावसायिकांना मात्र निश्चित अशी कुठलीच वेळ नसते. ऑफिसच्या कामासाठी त्यांना २४ तास उपलब्ध रहावे लागते.
• घरी असताना ऑफिसच्या कामाचे फोन कॉल्स कर्मचारी टाळू शकतात; पण स्वतंत्र व्यावसायिकाला मात्र कामासंदर्भात प्रत्येक फोन कॉल महत्वाचा असतो.
५. तुलनेने कमी जबाबदारी:
नोकरी करणाऱ्या व्यक्तीवर केवळ त्याच्या कामाची फार फार तर त्याच्या डिपार्टमेंटची जबाबदारी असते. परंतु व्यावसायिकांवर मात्र सर्व व्यवसायाची जबाबदारी असते.
• नोकरी करणाऱ्यांना दरवर्षी निश्चित रजा मिळतात. मोठी सुट्टी घेऊन रजेवर गेल्यास कामातून सुटका मिळू शकते, कारण तुमच्यासाठी ऑफिसमधलं काम थांबून राहत नाही. • स्वतंत्र व्यवसाय असेल तर मात्र रजेवर असतानाही ऑफिसच्या कामाची
जबाबदारी व्यावसायिकाला घ्यावीच लागते.
६. सर्वांगीण विकासाची संधी:
• कॉर्पोरेट क्षेत्र विविधतेने नटलेलं आहे. इथे एकाचवेळी विविध प्रकल्प चालू
असतात आणि त्याद्वारे असंख्य कर्मचाऱ्यांना नोकरीची संधी मिळत असते.
• तुमच्या कामात तुम्ही यशस्वी व्हावे म्हणून ऑफिसमध्ये तुमच्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. यातून ऑफिसच्या खर्चातून मोफत प्रशिक्षण, नवीन माहिती मिळते. नवीन ओळखी होतात, नवीन तंत्रज्ञान शिकता येते. या साऱ्याचा तुम्हाला वैयक्तिक विकासासाठीही उपयोग होतो.
७. वर्क फ्रॉम होम करणे शक्यः
• तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ‘वर्क फ्रॉम होम’ पर्याय देणाऱ्या संधी विविध क्षेत्रात उपलब्ध होत आहेत.
यामुळे तुमच्या वैयक्तिक अडचणींमुळे तुम्ही ऑफिसला जाऊ शकत नसाल, तर अशा प्रकारची नोकरी करून तुम्ही अर्थार्जन करू शकता.
• व्यावसायिकांना अशा संधी उपलब्ध होणे तुलनेने कठीण असते.
८. बोनस आणि इन्सेन्टिव्हज:
• कॉर्पोरेट नोकरीमध्ये मेहनत आणि प्रामाणिकपणाचे नेहमीच कौतुक होते.
कंपनीला जास्त नफा झाल्यास पगारवाढ मिळते.
• प्रमोशन, बोनस इन्सेन्टिव्ह अशा कोणत्याही स्वरूपात कर्मचाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे आणि हुशारीचे फळ मिळते. याव्यतिरिक्त कंपन्या कामगारांना विविध सुविधा पुरवतात