उत्कृष्ट वक्ता बनायचे असेल तर या गोष्टी टाळाच .

१.तुमच्या भाषणाचे पाठांतर करू नका.
२. पोपटासारखे रटाळ भाषण करू नका.
३. भाषण करण्याआधी भरपूर खाऊ नका.
४. भाषणात बढाई मारू नका.
५. गोंधळात पडू नका.
६. भाषणाची सुरुवात किंवा शेवट घाईघाईत करू नका.
७. भाषण करताना मोठ्या कागदाचा वापर करू नका, त्यामुळे तुम्ही भाषणाऐवजी वाचन करीत आहात असा समज होण्याची शक्यता असते.
८.भाषण देताना आपल्या हाताची घडी घालू नका.
९ जास्त वेळ बोलू नका, ते कंटाळवाणे वाटण्याची शक्यता असते.
१०. ध्वनीक्षेपक अगदीच तोंडाजवळ न ठेवता नऊ ते बारा इंचाच्या अंतरावर ठेवा
११. तुमच्यातील कमजोरीचा विचार करू नका या जगात कोणीही परिपूर्ण नसतो
१२. जास्त प्रश्न विचारु नका, त्याऐवजी उदाहरणे देऊन जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करा
१३. अंधश्रद्धावर विश्वास ठेवू नका.
हे सुद्धा वाचाचं – उत्तम संभाषण करण्यासाठी हे कराचं
१४. तुमचे शब्द व वाक्य पुन्हा पुन्हा उच्चारू नका.
१५. वैयक्तिक बाबतीत हस्तक्षेप करू नका व चर्चा करू नका
१६. अतिशहाण्यासारखे बोलू नका… पहिल्या विषयाबाबतीत सर्वांचे स्पष्टीकरण झाल्याशिवाय दुसऱ्या विषयाकडे वळू नका
१८. पुतळ्यासारखे उभे राहून बोलू नका.
१९. बोलत असताना कोणत्याही वस्तूचा आधार घेऊन उभे राहू नका.
२०. दुराग्रही बनू नका