आर्थिक

श्रीमंत लोक नेहमी आर्थिक सल्लागाराचा सल्ला का घेतात ? हे तुम्हाला माहित आहे का ?

आर्थिक सल्लागाराची गरज कधी व कोणाला ?

आर्थिक सल्लागाराची गरज कधी व कोणाला ?

जेव्हा तुम्ही तुमचे उत्पन्न मिळवायला सुरुवात करता तेव्हाच तुमचे बचतीसाठी आर्थिक नियोजन सुरु व्हायला हवे. पुरेशी रक्कम जमा झाल्यावर त्या रकमेचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी आर्थिक सल्लागाराची गरज असते.

तुम्ही सुरूवातीपासून आर्थिक सल्लागाराची मदत घेतलेली नसेल परंतु स्वतः घेतलेले आर्थिक निर्णय चुकीचे वाटत असतील तर कुठलाही संकोच न बाळगता आर्थिक सल्लागाराची मदत घ्यायला हवी.

अनेक वेळा बोनस, पगारवाढ किंवा तत्सम कारणांमुळे मिळालेली मोठी रक्कम किंवा मालमत्ता तुमच्या नावावर झाल्यास त्या रक्कम, मालमत्तेचे नियोजन, त्यासाठीची गुंतवणूक व करनियोजन करताना तुम्हाला आर्थिक सल्लागार मदत करू शकतो. अशावेळी तुमचा चुकीचा निर्णय तुमच्या नुकसानीस कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या.

• तुमचे कुटुंब, मुले, निवृत्ती व निवृत्तिपश्चात आयुष्य यासाठी नियोजन करायचे असेल किंवा जर तुम्हाला पन्नाशीतच निवृत्त व्हायचे असेल तर तुम्हाला आर्थिक सल्लागाराची गरज आहे.

आर्थिक सल्लागाराचे काम हे सर्वसमावेशक आणि व्यापक असते.

• अनेक जण ‘कशाला पैसे खर्च करा, आपणच आपले नियोजन करू असा विचार करतात. त्याहून चुकीचे म्हणजे ते विविध इन्शुरन्स एजेंट किंवा बँकेतील मैनेजर अशा लोकांचा ‘फुकट’चा सल्ला घेतात. जगात कुठलीच गोष्ट फुकट नाही. तुम्हाला विकलेल्या महागड्या प्रॉडक्टस् मधून ते त्यांचे कमिशन / फी वसूल करतात.

हे ही वाचा- श्रीमंत बनायचे असेल तर अगोदर या गोष्टी मनातून काढून टाका.

• गुंतवणूकदाराच्या दृष्टीने स्वतंत्र आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्याचे अनेक फायदे आहेत. उदाहरणार्थ: भारतात सुमारे ५० पेक्षा म्युच्युअल फंड आहेत, त्यांच्या सर्व योजनांची संख्या काही हजारांच्या पुढे आहे. त्याचप्रमाणे भारतात २५ पेक्षा जास्त आयुर्विमा कंपन्या काम करतात, त्यांच्याकडील सर्व विमा योजनांची संख्यादेखील मोठी आहे. नक्की कुठल्या योजना निवडाव्यात याविषयी कोणीही गोंधळून जाणार. तुमचा आर्थिक सल्लागार तुम्हाला या सगळ्या गोंधळातून वाट काढायला मदत करतो.

बरेचजण इंटरनेटवरून आर्थिक विषयातील माहिती गोळा करून स्वतःचे आर्थिक निर्णय स्वतः घ्यायचा प्रयत्न करतात. स्वबळावर आपण सर्वच गोष्टी करू शकत नाही. इंटरनेट तुम्हाला नानाविध भरपूर माहिती देते, पण माहिती म्हणजे ज्ञान नाही. जास्त माहितीमुळे तुम्ही गोंधळता आणि चुकीचे निर्णय घेत यापासून तुम्हाला तुमचा आर्थिक सल्लागार वाचवतो.

• तुमची गुंतवणुकीची शिस्त आणि कठीण समयी तुमचा आत्मविश्वास जागृत ठेवण्यातही तुमचा आर्थिक सल्लागार मदत करतो.

अभ्यासू सल्लागाराच्या काही हजारांच्या फी मध्ये तुम्हाला लाखोंचा फायदा होत असतो. चांगल्या आर्थिक सल्लागाराची फी एक प्रकारची गुंतवणूकच आहे यावर विश्वास ठेवा आणि आर्थिक सल्लागाराची मदत घ्यायला मुळीच संकोच बाळगू नका !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button