Uncategorized

“ना पैशाने ,ना सौंदर्याने, जग जिंकूया फक्त बोलण्याने”

संभाषण चातुर्य सुधारण्यासाठी ४० मार्ग

संभाषण चातुर्य सुधारण्यासाठी ४० मार्ग

१. स्वतःहून स्वत: ची इतरांना ओळख करुन द्या.

२.झिडकारले जाण्याची भीती बाळगू नका, इतर लोक तुम्हाला भेटायला उत्सुक असतात असे समजा.

३.तुम्ही प्रथम अभिवादन करा.

४.हसतमुख रहा व विनोदी वृत्ती ठेवा.

५. दुसऱ्या व्यक्तींची नावे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.

६.जर तुम्ही विसरला असाल तर दुसऱ्या व्यक्तीला त्याचे नाव विचारण्यास लाजू नका.

७. नवीन कल्पनांचा स्वीकार करा.

८. इतर लोकांमध्ये प्रामाणिकपणे रस दाखवा

९. तुमच्या आवडीनिवडीविषयी व स्वतः विषयी इतरांना माहिती द्या

१०.लोकांची विचारपूस करा व त्यांच्या बाबतीत जास्तीत जास्त माहिती मिळवा.

११. जर एखादी व्यक्ती तुमचे नाव विसरली असेल तर पुन्हा सांगण्याचा संकोच करू नका.

१२ तुमचे संभाषण थोडक्यात व सुंदर असू द्या.

 १३ चाकोरीबाहेर जाऊन लोकांना भेटण्याची जोखीम  पत्करा

१४ नेहमीच उत्साहाने बोला, त्याद्वारे इतरांमध्ये चैतन्य निर्माण होईल.

 १५.आपले हावभाव प्रकट करण्याविषयी जागरुक रहा.

हे सुद्धा वाचा – चांगला वक्ता बनून उत्कृष्ट भाषण देण्यासाठी या २० मुद्याचा वापर करा .

१६ निवेदन सादर करण्यात सहजता आणा.

१७. विषयाच्या बाबतीत नेहमीच उत्सुकता ठेवा व तुमच्या बाबतीतील काहीतरी आव्हानात्मक घटना सांगा, जेणेकरुन श्रोते तुमची आठवण ठेवतील.

१८ लोकांना सामाजिक संमेलनाकरिता अथवा जेवणाकरिताबोलवा, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.

१९.लोकांना अधूनमधून शुभेच्छा देत रहा.

२०.माहितीची देवाणघेवाण करताना नेहमीच संतुलितपणा साधण्याचा प्रयत्न करा.

२१.  आपल्या भावनांचे व मतांचे प्रदर्शन करण्यास लाजू नका.

२२. तुमचे ज्ञान नेहमी अद्ययावत ठेवा, त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यास सोपे जाईल.

२३. लोकांना मदत करीत रहा, म्हणजे तुम्हाला मदतीची गरज भासल्यास ते मदत करतील.

 २४. तुम्ही त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत असल्याचे बोलणाऱ्याला जाणीव करून द्या.

२५. . दुसरी व्यक्ती बोलत असताना काळजीपूर्वक ऐका.

२६ तुमच्या मित्रांच्या नातेवाईकांच्या संपर्कात रहा.

२७.संभाषणाचे विषय बदलत रहा.

२८. संभाषण चालू असताना डोळ्यांनी संपर्कात रहा.

२९.दुसऱ्यांचे पेहराव, विशिष्ट पद्धत याविषयी त्यांची प्रशंसा व कौतुक करा. लोकांना स्तुती आवडते.

३०. लोकांच्या आवडीनिवडी शोधण्याचा नेहमी प्रयत्न करा.

३१. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांच्या सान्निध्यात रहा.

३२. लोकांना कळू द्या की, तुम्ही त्यांना जाणून घेण्यास उत्सुक आहात.

३३. सोशिक रहा, कारण प्रत्येक व्यक्तीची वागणूक तुमच्यापेक्षा वेगळी असते.

३४. दुसऱ्यांना त्यांचे संभाषणकौशल्य सुधारण्यास प्रोत्साहीत करा. त्या बदल्यात तुम्ही तुमच्या कौशल्यावर प्रभुत्व मिळवता.

३५. तुमचे संभाषण नेहमी हातमिळवणी करून व शुभेच्छा देऊन सुरू करा व संपवा.

३६. बोलताना दुसऱ्या व्यक्तीचे नाव वारंवार उच्चारत रहा.

३७.इतरांवर विनाकारण टीका करू नका अथवा तुमचा राग प्रदर्शित करु नका.

३८.निरर्थक व अश्लील बोलणे टाळा, त्यामुळे तुमचा वाईट प्रभाव पडण्याची शक्यता असते.

३९. दुसऱ्या लोकांना ते महत्त्वाचे आहेत याची जाणीव करून द्या व परस्परांमध्ये विजयी भावना निर्माण होऊ द्या.

४०)लक्षात ठेवा, उत्कृष्ट संभाषणाकरिता सराव करावा लागतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button