Uncategorized

दिव्यस्पर्शी क्लिनिकच्या वर्धापन दिनानिमित्त मोफत तपासणी व उपचार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ८९ रुग्णांनी घेतला लाभ

माढा/सोलापूर :
आम्लपित्त, अपचन, मूळव्याध व विविध पोटाच्या तक्रारींनी त्रस्त रुग्णांसाठी दिव्यस्पर्श क्लिनिक व निसर्गोपचार केंद्र, रिधोरे (ता. माढा, जि. सोलापूर) येथे मोफत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर आनंदी परिवार फाऊंडेशन, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले असून डॉ. कुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

या शिबिरामध्ये तब्बल ८९ रुग्णांनी सहभाग घेत मोफत तपासणी व सल्ल्याचा लाभ घेतला. रुग्णांची सविस्तर तपासणी करून त्यांना त्यांच्या प्रकृतीनुसार योग्य उपचार पद्धती, आहार मार्गदर्शन व जीवनशैलीतील आवश्यक बदल याबाबत माहिती देण्यात आली.

डॉ. कुमार गायकवाड यांनी यावेळी सांगितले की, “पोटाच्या समस्या या अनेक गंभीर आजारांचे मूळ असतात. योग्य वेळी निदान व निसर्गाधारित उपचार घेतल्यास या तक्रारी कायमस्वरूपी नियंत्रणात आणता येतात.” शिबिरादरम्यान रुग्णांना औषधोपचारासोबतच नैसर्गिक उपचार पद्धतींचे महत्त्वही पटवून देण्यात आले.

उपस्थित रुग्णांनी उपचार व मार्गदर्शनाबाबत समाधान व्यक्त करत केंद्राच्या उपक्रमाचे कौतुक केले. अनेकांनी पुढील नियमित उपचारांसाठी नोंदणीही केली.

पोटाच्या विकारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांनी विलंब न करता दिव्यस्पर्श क्लिनिक व निसर्गोपचार केंद्राशी संपर्क साधून तज्ज्ञ मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. योग्य वेळी उपचार घेतल्यास दीर्घकालीन त्रास टाळता येऊ शकतो, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button