ऐकण्याची कला आत्मसात करण्यासाठी या १० गोष्टी करा , जीवनात १० पट जास्त वेगाने प्रगती कराल .

१) दुसरे वक्ते जे काही बोलतात, त्याचा पूर्वग्रह न ठेवता, मूल्य मापन करण्याचा प्रयत्न करा.
२) चांगले श्रोते बनण्यासाठी एकाग्रतेचा अवलंब करा.
3) वक्त्याबद्दल तुमच्या भावना व्यक्त करू नका, त्यामुळे त्याच्या चर्चेतील सहभागावर परिणाम होऊ शकतो.
४. ऐकत असताना मन विचलित होऊ न देता एकाग्रता साधा.
५)नेहमी प्रश्न विचारून तुमच्या सर्व शंकांचे निरसन करा. तुमच्या बाजूनेच सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ नका.
६. समोरची व्यक्ती बोलत असताना तुमच्या मनावर ताबा ठेवा व समोरच्या व्यक्तीचे म्हणणे कसे खोटे पाडावे याबाबतीत विचार करत बसू नका.
हेसुद्धा वाचा – चांगला वक्ता बनून उत्कृष्ट भाषण देण्यासाठी या २० मुद्याचा वापर करा .
७. विचलित श्रोते बनू नका. शांत व गंभीर बना
८)समोरच्या व्यक्तीचे बोलणे संपण्यापूर्वीच तोंड उघडणारे फटकळ श्रोते बनू नका…
९)ऐकत असल्याचे ढोंग करू नका. तुम्ही दुर्लक्ष करत आहात, हे समोरच्या वक्त्याला ताबडतोब कळते.
१०) सहानुभूती व आस्था असलेला समंजस श्रोता बना. ऐकताना डोळे व कान उघडे ठेवा आणि तोंड बंद ठेवा