जीवनातील कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगी येणारे १५ तंत्र

आपल्याला बऱ्याच अडचणी असतात, ज्यांची उत्तरे आपल्याला हवी असतात. कोणताही प्रश्न सोडविण्यासाठी खालील पायन्यांचा वापर केल्यास प्रश्न सोडविण्यास मदत होते :
१)तुमचा प्रश्न समजून घ्या आणि तो कागदावर लिहून काढा
२) वयस्कर व्यक्तींकडे अथवा अनुभवी व्यक्तींकडे तुमचा प्रश्न / अडचण विशद करून त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे मत जाणून घ्या.
3) तुम्ही तुमचा प्रश्न सोडविण्यासाठी करणार असलेल्या कृतीचे बरेवाईट परिणाम यांचा विचार करून ते लिहून काढा. जास्त
४) तुमचा प्रश्न सोडविण्यासाठी उपलब्ध होणारे जास्तीत विकल्प कल्पनेअंती शोधून काढा.
५) तुमच्या कोणत्याही कल्पनेला अथवा विचाराला कात्री लावू नका.
६)जे शक्य नाही ते खोडून टाका. प्रत्येक विकल्पातून यशाच्या शक्यतेची तुलना करा.
हे सुध्दा वाचा -यश मिळवून देणाऱ्या या दहा गोष्टी तुम्ही नेहमी करता का?
७)वस्तुस्थिती व तुमची कल्पनाशक्ती याच्या आधारे दोन किंवा तीन उत्तरांची निवड करा.
८)तुमचा निर्णय घ्या आणि त्या निर्णयामुळे होणाऱ्या परिणामांविषयी जागरूक रहा.
९)जो निर्णय तुम्हाला आत्मविश्वास देईल आणि मनावरील दडपण दूर करील तो योग्य निर्णय आहे.
१०)तुमचा निर्णय कृतीत आणण्याकरिता कार्य करा.
११) प्रथम लहान कृती करा. सकारात्मक परिणाम आढळल्यास मोठी कृती करण्याकरिता सिद्ध व्हा.
१२. तुमच्या नियोजित कार्यक्रमाला सामर्थ्य (strengths), कच्चे दुवे (weaknesses), सुसंधी (opportunities) आणि धोका (threats) या चार मूल्यमापनांच्या (SWOT) कसोटीवर पारखा.
हे सुध्दा वाचा -हार का जीत ? तुम्ही काय निवडता हे पहाच.
१३) आवश्यक त्या तडजोडी करा.
१४) यशाचाच विचार करा.
१५)यशस्वी झालात तर, त्याचा आस्वाद घेऊन त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी विचार करा परंतु अपयशी ठरल्यास काळजी करत बसू नका. त्याऐवजी अपयशातून बोध घेऊन अपयशावर मात करण्याकरिता पुन्हा सुरुवात करा.