हे दहा गुण तुमच्यात असतील तर तुम्हाला विजयापासून कोणीही रोखू शकणार नाही.

१) गंभीर वचनबद्धता.
व्यक्तीच्या जीवनाचा दर्जा हा प्रमाणशीर उत्कृष्ट वचनबद्धतेशी सरळ निगडीत आहे. मग त्यांनी निवडलेले क्षेत्र कोणतेही असू देत.
२)ज्वलंत इच्छा.
मनुष्याचे मन जी कल्पना करत असते व विश्वास ठेवत असते, ते मन साध्य करत असते.
३) जबाबदारी स्वीकारणे
उत्तरदायित्त्व जेव्हा इच्छा बनते तेव्हा तिचा शेवट आनंदात होतो.
४) कष्ट करण्याची जिद्द.
जेवढे तुम्ही कष्ट कराल, तेवढे तुम्ही भाग्यशाली व्हाल.
५) चारित्र्य.
चारित्र्य हे प्रारब्ध आहे. माणूस हा स्वतःच्या भविष्याचा शिल्पकार आहे.
६) सकारात्मक विश्वास.
आवश्यक गोष्टी करण्यापासून सुरूवात करा, नंतर शक्य त्या गोष्टी करा आणि नकळत अशक्य गोष्टीही तुम्ही करू लागाल
७) दाता बना.
जेवढे चांगले आणि इच्छित तुम्ही द्याल, तेवढे तुम्हाला जास्त मिळेल.
८. निर्धार.
मनुष्य हा नायक आहे, त्याचे कारण तो इतरांपेक्षा शूर आहे हे नसून, तो इतरांपेक्षा दहा मिनिटे जास्त वेळ शूर आहे हे होय.
९)शिकत रहा.
शिकण्याकरिता कधीही वयाचे बंधन नसते, स्वतःला बदलण्याकरिता वेळेचे बंधन नसते.
१०) तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा.
तुमच्या मते एखादी गोष्ट शक्य आहे तर ती शक्य आहे किंवा ती गोष्ट अशक्य आहे तर ती अशक्य आहे.



