Business Management
अशा पॉन्झी स्कीम्स समजून घेतल्या तर तुम्हाला कोणीही फसवू शकणार नाही.
पॉन्झी स्कीम्स - फसवणूक करणाऱ्या योजना !

पॉन्झी स्कीम्स – फसवणूक करणाऱ्या योजना !
भामटा शिरोमणी : चार्ल्स पॉन्झी
आर्थिक गंडा घालणाऱ्या योजनांना ‘पॉन्झी स्कीम्स’ का म्हणतात याची कहाणी इसापनीतीच्या गोष्टींसारखी रंजक आहे. आपल्यासमोर येणाऱ्या असंख्य जाहिरातींपैकी काही ब्रँड इतके लोकप्रिय होतात की त्या ब्रँडचे नावच त्या उत्पादनाची ओळख बनून जाते. उदा. बिसलेरी, झेरॉक्स अशी अनेक नावं आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहेत. तसेच पॉन्झी स्कीम मधील नाव चार्ल्स पॉन्झी याच्या नावावरून आले आहे.
चार्ल्स पॉन्झीचा कारनामा
- इटलीमध्ये जन्मलेल्या चार्ल्स पॉन्झीने सन १९२० मध्ये अमेरिकेत अकल्पनीय भरपूर परताव्याचे आश्वासन देणारी योजना सुरू केली.
- या योजनेने गुंतवणूकदारांना ४५ दिवसांत ५०% आणि ९० दिवसात १००% परतावा देण्याचे आश्वासन दिले होते.
- कालांतराने जसे सर्व फसव्या योजनांचे होते तसे या योजनेत गुंतवणूकदारांचे कोट्यवधी डॉलर्स बुडाले. त्या काळात ही रक्कम म्हणजे खूपच मोठी रक्कम होती. तेव्हापासून अशा सर्व फसव्या योजना पॉन्झी योजना म्हणून ‘ओळखल्या जाऊ लागल्या.
- झटपट पैसा मिळविण्याची घाई, चंगळवादी जीवनशैलीची ओढ यामुळे आज २०२३ मध्ये म्हणजेच १०० वर्षांनंतरही जगभरातील लोक अशाच योजना आणि ऑफर्सचे बळी पडत आहेत. दुर्दैवाने गणितात खूप हुशार समजणारे आपण भारतीयही याला अपवाद नाहीत.



